ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाबाबत काळाबाजार आढळला तर तक्रार करा

 



 ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाबाबत काळाबाजार आढळला तर तक्रार करा 



सहाय्यक आयुक्त (औषधे),अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आवाहन


रत्नागिरी:-मागील काही दिवसांपासुन राज्यात व रत्नागिरी जिल्हयात कोविड रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे व त्या अनुषंगाने मेडीकल ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाच्या वापरात वाढ होत आहे. त्यामुळे प्रथम प्राधान्याने मेडीकल ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाचा पुरवठा सुरळीतपणे होत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी कार्यालयाकडुन मेडीकल ऑक्सीजनचा अखंडीत पुरवठा सुरु ठेवण्यासाठी जिल्हयातील मेडीकल ऑक्सीजन उत्पादक यांच्याशी समन्वय ठेवण्यात येत असुन त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येत आहेत. त्यांना शासकीय व खाजगी रुग्णालये यांना अखंडीत मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरु ठेवण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. या कार्यालयाकडुन दररोज जिल्हयात निर्मीत ऑक्सीजन साठा, बाहेरुन प्राप्त ऑक्सीजन साठा, वापर झालेला साठा व शिल्लक साठा यांचा नित्यनियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाचा साठा कायम उपलब्ध ठेवण्याबाबत रत्नागिरीतील घाऊक विक्रेत्यांना या कार्यालयाकडुन योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत. सध्य स्थितीत रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाचा साठा सर्व कोविड रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असुन घाऊक विक्रेत्यांनी आणखीन नवीन पुरवठादारांकडे मागणी नोंदविण्याच्या सुचना या कार्यालयाकडुन देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मेडीकल ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शन या औषधाबाबत काळाबाजार आढळला अथवा याबाबत काही तक्रार असल्यास सु.ह.गवळी, सहाय्यक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन कार्यालय रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments