रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
"कोरोनाने जीव नाही गेला तरी कंगाल झाल्यावर जीव द्यावा लागणारच आहे"
रत्नागिरी : शासनाने काल वाढत्या कोरोना संक्रमणावर उपाय या हेतूने नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावली नुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मात्र शासनाच्या या नियमाला आधीच मेटाकुटीला आलेल्या व्यापारी वर्गाने जोरदार विरोध केला आहे. रत्नागिरीतील अनेक व्यापाऱ्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया रत्नागिरी खबरदार जवळ व्यक्त केल्या. या आधीच्या लॉक डाऊनमुळे या छोट्या व्यापाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कामगारांचे पगार, वीज बिले यामुळे छोटा व्यापारी कंगाल झाला आहे. आता जर सरकारने असा नियम लागू केला तर बँकांचे हप्ते, नोकरांचे पगार कुणी द्यायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. एकवेळ कोरोना होऊन जीव नाही गेला तर भिकेकंगाल होऊन आत्महत्या करावी लागेल असे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.
मागील लॉकडाऊन मुळे संक्रमण थांबलेच नाही
रत्नागिरीतील संतप्त व्यापारी वर्गाने मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उदहरण दिले आहे. मागील वर्षी ज्यावेळी लॉकडाऊन सुरु करण्यात आला त्यावेळी रत्नागिरीत फक्त ३ रुग्ण होते. मग लॉकडाऊन केल्यावर रुग्ण संख्या वाढली कशी ? तर ज्यावेळी लॉकडाऊन उठवण्यात आला त्यावेळी दिवसाला सरासरी १०० रुग्ण सापडत होते. मग लॉकडाऊन उठवण्यात का आला ? याचाच अर्थ असा कि रुग्ण संख्या रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काहीही उपयोग झाला नाही उलट व्यापारी भिकेकंगाल झाला, अर्थचक्र कोलमडले.
अत्यावश्यक सेवेतील दुकानातून कोरोनाचा प्रसार होत नाही काय ?
नव्या नियमावली नुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत. मग या दुकानातून कोरोनाचा प्रसार होत नाही काय ? कोरोना काय दुकानाच्या पाट्या बघून आत शिरतो काय ? असा संतप्त सवाल व्यापारी विचारत आहे. शासनाने जारी केलेली नियमावली हि हास्यास्पद आहे. त्यापेक्षा मास्क, सॅिनटायझर, सामाजिक अंतर याची कडक अंमलबजावणी करावी असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जीव गेला तरी दुकान बंद करणार नाही
आता जीव गेला तरी दुकान बंद करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. एकवेळ कोरोनाने जीव गेला तरी चालेल पण आता व्यापार बंद करणार नाही. माझ्या व्यवसायावर मझे आणि माझ्या कर्मचाऱ्यांचे पोट आहे त्यामुळे आता दुकान बंद करण्याचा निर्णय आम्ही मान्यच करू शकत नाही अशी रोखठोक भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment