जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर





 पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर


मुंबई :आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थे ठेवला. सलग चौथ्या दिवशी देशातील इंधन दर स्थिर ठेवेले आहेत.दरम्यान वस्तू आणि सेवा कर कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची मागणी जीएसटी लागू झाल्यापासून होत आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या बाजारात तेजी आहे. तेलाची मागणी वाढली आहे. तर ओपेक देशांनी उत्पादनात वाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.आज शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता.
जागतिक बाजारात गुरुवारी ब्रेंट क्रूडचा भाव २.१२ डॉलरच्या तेजीसह ६४.८६ डॉलरवर बंद झाला. तर यूएस टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.२९ डॉलरच्या तेजीसह ६१.४५ डॉलर प्रती बॅरल झाला.वस्तू आणि सेवा कर कक्षेत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची मागणी जीएसटी लागू झाल्यापासून होत आहे. मात्र जीएसटी लागू होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारचा करांचा बोजा असल्याने ग्राहकांना सध्या उच्चांकी किंमत मोजावी लागत आहे.केंद्र सरकरने राजकीय इच्छाशक्ती दाखवून पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केला तर पेट्रोल ७५ रुपये लीटर आणि डिझेल थेट ६८ रुपये लीटर इतके कमी दरात उपलब्ध होईल, असा दावा 'एसबीआय'च्या आर्थिक अहवालात करण्यात आला होता.





........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments