देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार नवे रुग्ण




 देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार नवे रुग्ण



देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. एकूण रुग्णांची संख्या आता १ कोटी ३५ लाख २७ हजार २१७ झाली आहे. कोविड १९ संसर्गातून बरे होण्याचा दर ९० टक्क्यांच्या खाली गेला आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १२ लाखांच्या पुढे गेले असून मृतांची संख्या १ लाख ७० हजार १७९ झाली आहे. दैनंदिन मृत्यू संख्या २४ तासांत ९०४ झाली आहे. १८ ऑक्टोबरपासून हा उच्चांकी आकडा आहे.लागोपाठ ३३ व्या दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १२ लाख १ हजार ९ झाली आहे. एकूण रुग्णांचे हे प्रमाण ८.८८ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरून ते ८९.८६ टक्के झाले आहे. १२ फेब्रुवारीला उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वांत कमी म्हणजे १ लाख ३५ हजार ९२६ होती.  १८ सप्टेंबर २०२० रोजी ती १० लाख १७ हजार ७५४ होती. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी २१ लाख ५६ हजार ५२९ झाली आहे. यातील मृत्युदर १.२६ टक्क्यांनी कमी झाला आहे. आतापर्यंत२५ कोटी ७८ लाख ६ हजार ९८६ नमुने तपासण्यात आले असून ११ एप्रिल रोजी ११ लाख ८० हजार १३६ नमुने तपासण्यात आले आहेत.


दहा राज्यांत करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ


महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या दहा राज्यांत करोनाचा प्रसार वेगाने होत असून दैनंदिन रुग्णवाढ ही ८३.०२ टक्के झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात रोजची रुग्ण संख्या वाढत असून २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण वाढले आहेत. एका दिवसातील ही आतापर्यंतच्या साथीतील सर्वांत मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ६३,२९४ रुग्ण सापडले असून उत्तर प्रदेशात १५,२७६, दिल्ली १०,७७४  या प्रमाणे रुग्ण सापडले आहेत. एकूण सोळा राज्यांत रुग्ण संख्या वाढत चालली असून महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगण, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, पश्चिाम बंगाल या राज्यांचा त्यात समावेश आहे. भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १२ लाख १ हजार ९ इतकी झाली असून हे प्रमाण  देशातील एकूण संसर्गित व्यक्तींच्या ८.८८ टक्के आहे. एकूण दिवसभरात ९२,९२२ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यात एकूण उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण भारतातील रुग्णांच्या तुलनेत ७०.१६ टक्के आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments