पुन्हा होणार देशभर लाॅकडाउन ; अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केलं महत्वाचे विधान
पुन्हा होणार देशभर लाॅकडाउन ; अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केलं महत्वाचे विधान
नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात लॉकडाउन आज रात्री ८ पासून लागू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देखील करोना नियंत्रणासाठी पावले उचलली जात आहे. मात्र देशभरात कठोर लॉकडाउन होणार का याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचे विधान केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की देशभर कठोर लॉकडाउन करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे देशभर टाळेबंदी करण्यात आली होती तशी होणार नाही, असे सीतारामन यांनी सांगितले. मात्र स्थानिक पातळीवर करोना नियंत्रणासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ८२ हजार ३३९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७२ हजार ०८५ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १३ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, करोनाला थोपवण्यासाठी केंद्र सरकारनं रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या करोना लसीला परवानगी दिल्यानंतर अमेरिका, जपान आणि ब्रिटनसहीत इतर परदेशी लसींनाही आयात करण्याची परवानगी दिलीय.वर्ल्ड बँकेच्या प्रमुखांशी सीतारामन यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. करोना रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अर्थ मंत्रालयाने पावले उचलली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. करोनाचा कहर वाढत असला तरी पूर्णपणे लॉकडाउन करून अर्थव्यवस्था ठप्प करण्याचा कोणताही विचार नाही, असे सीतारामन यांनी सांगीतले.स्थानिक पातळीवर करोनाबाधितांना गृह विलीगीकरणसारखे पर्याय देऊन करोना नियंत्रणासाठी उपाय केले जातील. अर्थ मंत्रालयाने करोना नियंत्रणासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी वर्ल्ड बँकेने अतिरिक्त कर्ज देण्याच्या निर्णयाचे सीतारामन यांनी स्वागत केले.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment