गणेशगुळे येथे आढळला अज्ञाताचा मृतदेह




 गणेशगुळे येथे आढळला अज्ञाताचा मृतदेह 


रत्नागिरी:- तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी अज्ञाताचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२ एप्रिल) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत गणेशगुळेचे पोलीस पाटील संतोष जनार्दन लाड यांनी पूर्णगड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी तेथील ग्रामस्थांना गणेशगुळे समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलीस पाटील लाड यांना देताच त्यांनी मृतदेहाची पाहणी केली; परंतु मृतदेह कुजल्यामुळे त्याची ओळख पटविणे शक्य नव्हते. याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत अधिक तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल धातकर करीत आहेत.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



टिप्पण्या