बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी हुसैन तडवी




 बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी हुसैन तडवी


रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीतच्या अखत्यारीत बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी व प्रादेशिक कार्यकारिणीची सभा दिनांक २९ मार्च रोजी नाशिक येथे संपन्न झाली. सदर राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तुषार जाधव यांनी महावितरण कर्मचारी अहोरात्र मेहनत करुन वसुलीचे कामकाज करत असताना कर्तव्य बजावत असतानाही मारहाणीसारखे प्रकार घडतात त्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी परिमंडळाची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. सदर कार्यकारिणीत प्रशासनाचा योग्य अभ्यासक, मनमिळावू स्वभावाचे हुसैन तडवी यांची परिमंडळ अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. सदरची नेमणूक केंद्रीय सरचिटणीस राजन शिंदे, केंद्रीय उपाध्यक्ष तुषार जाधव, प्रादेशिक अध्यक्ष मुकेश गजभिये, मंडल अध्यक्ष विजय चव्हाण, कोकण प्रादेशिक सदस्य बाळकृष्ण झोरे, श्रीमती रोहिणी साळसकर, स्वप्नाली केदार तसेच राज्यातील विविध परिमंडल, मंडल, विभागीय सदस्य उपस्थीत होते. 



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments