जांभिया-गट्टा जंगलात चकमक; २ नक्षलवाद्यांना कंठस्नान
जांभिया-गट्टा जंगलात चकमक; २ नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. पोलिसांकडून अजूनही जंगल परिसरात शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस ठाण्यावर बुधवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर नक्षलविरोधी पोलीस पथक जांभिया-गट्टा जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. आज पहाटे या जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाले. अजूनही या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.२९ मार्च रोजी खोब्रामेंढा जंगल परिसरात नक्षली नेता भास्करसह पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले होते. या घटनेनंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता. नक्षलवाद्यांनी नुकतीच भारत बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे रस्त्याच्या कामावरील सहा वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर गडचिरोली पोलीस दलाने ही कारवाई केली आहे.दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. त्यांची ओळख अजून पटली नाही. त्या भागात अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगल असल्याने त्या भागात संपर्क होऊ शकला नाही.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा