रिझर्व्ह बँकेची इमारत उडविण्याची धमकी
रिझर्व्ह बँकेची इमारत उडविण्याची धमकी
मुंबई:-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दक्षिण मुंबईतील मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल आला आहे. आयएसच्या नावाने आलेल्या या ई-मेलनंतर 'आरबीआय'च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फोर्ट येथील आरबीआय अमर भवन इमारतीमध्ये अनेक विभाग आहेत. यापैकी डिपार्टमेंट आफ करंन्सी मॅनेजमेंट या विभागात ८ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास webmaster@rbi.org.in या मेलआयडीवर एक धमकीचा मेल आला. या मेलमध्ये आयएस या दहशतवादी संघटनेच्या नावाचा उल्लेख करून मी दहशतवादी असून उद्या तुमची बँक बॉम्बने उडवून देणार, असे यात नमूद करण्यात आले होते. या मेलची गंभीर दखल घेत या विभागातील अधिकाऱ्यांनी ही बाब सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. या मेलनंतर इमारतीची सुरक्षा अधिक कडक करतानाच सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे वाटत असले तरी तांत्रिक पुराव्यांवरून हा मेल नेमका आला कुठून याचा शोध पोलिस घेत आहेत.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment