संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गवळवाडी येथे राजाराम काब्दुले यांच्या घराला भीषण आग






संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गवळवाडी येथे राजाराम काब्दुले यांच्या घराला भीषण आग


उपसरपंच बापू लोटणकर यांनी घटनेची केली पाहणी



संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गवळवाडी येथे राजाराम काब्दुले यांच्या घराला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. दिनांक 31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता राजाराम काब्दुले यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. घरातून येणारा धुर बघून वाडीतील लोकांनी दरवाजा फोडून आग आटोक्यात आणली. परंतु आगीत घराचे खूपच नुकसान झाले. ही बातमी समजताच पुर्ये गावचे उपसरपंच बापू लोटणकर यांनी त्वरित तलाठीना घेऊन घटनास्थळी पोहोचले. यावेळी बापू लोटणकर यांनी तात्काळ संबंधीतांनी तात्काळ पंचनामा करुन नुकसानग्रस्त राजाराम काब्दुले यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org