निवळी येथे मुलाकडून आईला बांबूने मारहाण




निवळी येथे मुलाकडून आईला बांबूने मारहाण



 चिपळूण : तालुक्यातील निवळी-कुंभारवाडी येथे जमिनीच्या वादातून एकाने ७० वर्षीय वृद्ध आईला बांबूने मारले आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी संशयित सुरेश गणपत कुंभार (रा. निवळी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. ३१ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चंद्रभागा गणपत कुंभार या जखमी झाल्या आहेत. त्यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्या मुलाने दारूच्या नशेत आई व नातवाला शिवीगाळ करून सामायिक जमिनीतील विकलेल्या झाडांच्या व्यवहारातील पाच हजार रुपये तू घेतलेस असे विचारले व बांबूची काठी आईच्या डोक्यात हाणली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org