अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधन वाढ व इतर मागण्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर : (प्रतिनिधी) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये अंगणवाडी सेविकांना रुपये पंधराशे व मिनी अंगणवाडी सेविकांना रुपये बाराशे पन्नास तसेच मदतनिसांना 750 रुपये मानधन वाढ देण्याचे जाहीर केले होते मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल वरून अहवाल भरण्याचे व अंगणवाडीचे कामकाज करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत सध्या त्याची अंमलबजावणी सुरू असून त्यामध्ये अनेक अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण पूर्ण करून आपले कामकाज सुरू केले आहे तथापि काही सेविकांना त्याचा त्रास होत आहे परिणामी अनेक सेविका आजारी पडून हवालदिल झाल्या आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने पुढील मागण्याचे निवेदन सादर केले आहे.
१).अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये सेविकांना रुपये १५००/- व मिनी अंगणवाडी सेविकांना रुपये १२५०/- तसेच मदतनिसांना रुपये ७५०/- मानधन वाढ देण्याचे जाहीर केले आहे. याची तात्काळ अंमलबजावणी करावी.
२).अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवा संपत्तीनंतर मिळणारे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध सेविका मदतनीसांचे प्रचंड हाल व उपासमार होत आहे.
३).अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रवास भत्ते गेल्या ३(तीन) वर्षांपासून दिलेले नाहीत.ते तात्काळ देण्यात यावे.
४).मोबाईलवरून काम करीत असताना मोबाईल नादुरुस्त झाल्यास, हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास शासनाने कोणतीही नुकसान भरपाई मागू नये. उलट सेविकेला पर्यायी दुसरा मोबाईल उपलब्ध करून घ्यावा. त्याबाबत सेविकेकडून घेण्यात आलेले हमीपत्र तात्काळ रद्द करणेत यावे.
५).मोबाईल चे काम ज्यांना जमत नसेल त्यांच्यावर दबाव आणू नये किंवा कारवाई करू नये. उलट त्यांना ते पूर्णपणे शिकून घेण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी द्यावा व त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण घेण्यात यावे.
६).सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्राथमिक शाळा सकाळी ८ ते १२ या वेळेत भरत असतात. अंगणवाडीची वेळ सुद्धा प्राथमिक शाळेच्या वेळेशी सुसंगत असावी व तसा आदेश सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात यावेत.
७).अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा ताबडतोब भरण्यात याव्यात. सेविकेची जागा रिक्त असल्यास तिचे मोबाईलवरील काम करण्याची मदतनिसांना सक्ती करू नये.
८).अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मोबाईलवर काम करत असताना शासनाकडून फक्त ४००/- रुपये रिचार्जसाठी मिळतात त्यामध्ये वाढ करून नियमितपणे ही रक्कम मिळावी.
९).जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या रिकाम्या खोल्या अंगणवाडीसाठी वापरण्यास द्याव्यात.
अशा विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यावेळी देणेत आले.
यावेळी कॉ. जयश्री पाटील, कॉ. आप्पा पाटील, अर्चना पाटील, अनिता माने, प्रवीण आंबले, अश्विनी सुर्वे, जमिरा शेख, वर्षां शिरोलीकर, स्वाती जाधव आदी पदाधिकारी व सेविका उपस्थित होत्या.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment