तस्करांच्या गोळीबारात दोन पोलीस ठार
तस्करांच्या गोळीबारात दोन पोलीस ठार
जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात पोलिसांनी वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर थांबवल्यानंतर संशयित अंमली पदार्थ तस्करांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शिपाई ठार झाले.तस्करांना पकडण्यासाठी पोलीस पथकांनी शनिवारी रात्री निरनिराळ्या ठिकाणी अडथळे उभारले होते. दोन जीप आणि दोन एसयूव्हीमधून प्रवास करणारे आरोपी कोटडी व रायला या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तपासणी नाके पार करत होते. सशस्त्र तस्करांनी आधी कोटडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पथकावर गोळीबार केला. यात ओंकार रायका नावाचा शिपाई जखमी होऊन नंतर मरण पावला. गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी नंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले. यावेळी रायला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपासणी नाके पार करताना आरोपींनी पुन्हा पोलिसांवर गोळीबार केला. यात पवन चौधरी हा शिपाई ठार झाला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून रोखण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलो, मात्र अद्याप कुणालाही अटक केले नाही.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment