कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाचा १० वा वर्धापन दिनानिमित्य अंक प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाचा १० वर्धापन दिन राजश्री शाहू स्मारक भवन येथे अंक प्रकाशन व केक कापून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, (ट्रॉफी), प्रमाणपत्र,राजश्री शाहू वसा आणि वारसा पुस्तक,मानाचा कोल्हापुरी फेटा,शाल,श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.संघटनेचे रवी सागर हळवणकर यांनी संघाचा १० वर्षाचा आढावा सर्व मान्यवर व उपस्थितांसमोर मांडला यावेळी प्रमुख उपस्थिती मा. पंकज देशपांडे सचिव कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ.सुरज पवार कोल्हापूर कॅन्सर सेंटर,अॅड. धनंजय पठाडे, ग्रोबझ ट्रेडिंग कंपनी चे विश्वासराव कोळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विशाल लोंढे यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगितले. पंकज देशपांडे यांनी बैतुल माल कमिटी व जमियत उलेमा -ए- शहर या यांचे कार्य समाजात प्रेरणादायी तर डॅा. पवार यांनी समाजामध्ये भेद-भाव न करता समाजामध्ये एकत्र येऊन समाज घडविला पाहिजे व पत्रकार संघाने असेच उपक्रम करावे व संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अॅड.पठाडे यांनी पत्रकार संघाचे कार्य व उपक्रम कौतुकास्पद आहे व या संघाच्या प्रत्येक उपक्रमास सदैव सोबत असू असे सांगितले. याप्रसंगी बैतूल माल कमिटी ला समाज भूषण पुरस्कार, जमियत उलमा -ए- शहर समाज गौरव पुरस्कार, मेघा विशांत एेनापुरकर समाज गौरव पुरस्कार, राजेंद्र गंगाराम कांबळे समाजरत्न पुरस्कार, स्वना पोवार यशस्वी महिला उद्योजक पुरस्कर तर गेले ३५ वर्ष पत्रकारितेमध्ये काम करणारे व आपल्या उत्कृष्ट फोटोग्राफी मधून समाजाचे प्रश्न मांडणारे तय्यब अली यांना उकृष्ट फोटोग्राफीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी कोल्हटकर, उपाध्यक्ष मुबारक अत्तार, रवीसागर हाळवणकर, बाजीराव गावकर, स्वप्निल पन्हाळकर, प्रकाश कांबळे, आफताब खान, तोहिद मुल्ला, महंमदयासीन शेख, अलंकार माने, अमित भालेकर, अशोकराव मोहिते व सभासद उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment