मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चालवली रुग्णवाहिका; नेमकं काय घडलं पाहा...
मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चालवली रुग्णवाहिका; नेमकं काय घडलं पाहा...
बुलडाणा: सध्या करोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत, असे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आमदार निधीतून सिंदखेडराजा व देऊळगाव राजा येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. बुधवारी सर्व सुविधांनी सुसज्ज अशा या रुग्णवाहिकांचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने केले. फित कापण्याच्या औपचारिकतेपलीकडे जात रुग्णवाहिका चालवून शिंगणे यांनी लोकार्पण पार पाडले. त्यामुळे हा सोहळा लक्ष्यवेधी ठरला. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आरोग्य सुविधांबाबत लोकांची अनेक गाऱ्हाणी होती. ही बाब ध्यानात घेवून आमदार तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. स्थानिक विकास निधीच्या पुढे जावून शिंगणे यांनी आपल्या आमदार निधीतून आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सध्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना व उपलब्ध रुग्णवाहिकांवर ताण आला असतानाच डॉ. शिंगणे यांनी या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा मोठा फायदा या भागातील आरोग्य यंत्रणेला होणार आहे. या सुसज्ज कार्डिअॅक अँब्युलन्सचे लोकार्पण केले जात असताना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णवाहिकेत नेमक्या कोणत्या सुविधा आहेत व त्या कशा उपयोगात आणल्या जातात, याचीही संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment