गॅस, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करून व सामान्य जनतेच्या दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सोडूनच लॉकडाऊन लावावे. : अन्यथा आंदोलनाचा इशारा :- मनसेचे निमशिरगाव ग्रामपंचायतचे सदस्य रोहित लोहार

शिरोळ : (प्रतिनिधी) गेल्या एक वर्षभरापासून कोरोनामुळे लोक हवालदिल झाले आहेत. त्यातच गगनाला भिडलेली महागाई, त्यामुळे सामान्य लोकांना जगणे कठीण झाले. आहे दैनदिन जगण्यातल्या  खाद्यतेल, गॅस, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर यामुळे सर्वच क्षेत्रात दरवाढ झाली आहे. सरकारने दिलेली वीजबिल माफीचे आश्वासन फोल ठरले आहे, पण या आश्वासनावर विश्वास ठेवून या आमच्या सामान्य नागरिकांनी वीज बिल भरले नाही. त्यांची थकित वीज बिले त्या वीजबिलावर वरील दंड स्वरूपातील रक्कम आता इतकी झाली आहे, कि हे बिल भरण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागत आहे. कारण वीजबील भरले नाही, तर वीज कट केली जाते. म्हणून मग कर्ज काढून वीजबिल भरल्या शिवाय पर्याय नाही. म्हणजे पुन्हा या सरकारनं सामान्य जनतेला कर्जबाजारी केले आहे. अगोदरचे घेतलेले कर्ज अजून फिटलेले नाही, त्यात हे नवीन कर्ज.  मग या कर्जाच्या वसुलीसाठी येणारे मायक्रो फायनान्स वाले नको ते बोलून, धमक्या देऊन, अनाठाई, चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुलीचा तगादा सुरू करून सामान्य जनतेचे जगणे अवघड करत आहेत. मग यात आमच्या गरीब, हातावरच्या पोट असणाऱ्या माणसांनी जर आत्महत्या केली. तर याला जबाबदार कोण...?मुळात ही आत्महत्या नाहीच. या सरकारने घडवून आणलेली हत्याच असेल.  कारण आता या लोकांच्या हातांना काम नाही.  कुठे काम करायला जायचे तर कोरोनामुळे तेही काम मिळत नाही.  काम नाही, तर घरात खायला कुठून मिळणार...? त्यात आता पुन्हा या लॉकडाऊनच्या परिस्थितीत, त्यांनी जगायचं कसं..? का मग तडफडून मरायचं..? हा  प्रश्न घेऊन  खळगी पडलेल्या पोटासाठी, आसुसलेल्या डोळ्यांनी केलेली याचना या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जर दिसत नसेल, तर येणारे  वास्तव भयावह असेल. आणि याला जबाबदार  केंद्र सरकार व राज्य सरकार असेल.  त्यामुळे लोकांच्या भावनेशी न खेळता, वीज बिलाबाबतचा प्रश्न असेल, मायक्रोफायनान्स कंपन्यांची जुलमी कर्जवसुली असेल, खाद्यतेल, गॅस, पेट्रोल-डिझेलची दरवाढ असेल यावर वेळीच मार्ग काढून या हातावरचे पोट असणाऱ्या व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून, त्यांचे रोजगार बंद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि लॉकडाउन जर लादायचेच असेल, तर त्यांच्या दोन वेळच्या पोटाची सोय करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन करू. असा इशारा निमशिरगाव चे ग्रामपंचायत सदस्य व मनसेचे कार्यकर्ते श्री रोहित लोहार यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments