रॉकेट लाँचरसह एके-४७ ने हिडमाच्या बटालियनने जवानांवर केला हल्ला
रॉकेट लाँचरसह एके-४७ ने हिडमाच्या बटालियनने जवानांवर केला हल्ला
छत्तीसगडच्या सुकमामध्ये देशाला हादरवणारी घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी जवानांना वेढा घालून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यात २४ जवान शहीद झाल्याचं सांगण्यात येतं.
रायपूरः छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आता २४ जवान शहीद झाल्याची ( sukma attack ) माहिती आहे. कुख्यात नक्षली हिडमा याला पकडण्यासाठी जवान नक्षलवाद्यांच्या गड जंगल भागात घुसले होते. २००० जवाना यात सहभागी होते. जवानांच्या वेळवेगळ्या टीम यात करण्यात आल्या होता. नक्षलवाद्यांनी जवानांना घनदाट जंगलात घुसू दिलं. त्यानंतर त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.सुरक्षा दलांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या पैकी एक टीम कुख्यात नक्षलवादी हिडमाच्या याच्या बटालियनच्या घातक हल्ल्यात सापडली. यानंतर जवानांना वेढा घालून गोळीबार करत जोरदार हल्ला केला. हिडमाच्या बटालियनने जवानांना तीन बाजूंनी वेढलं होतं. जवान दाट जंगला अडकले होते. आणि डोंगरांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांचावर हल्ला केला.नक्षलवाद्यांनी वेढल्यामुळे जवानांवर निघण्याचा कुठलाही मार्ग नव्हत. तरीही जवानांनी हिडमाच्या बटालियनला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक नक्षलवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून ४ चार ट्रॅक्टर भरून आपल्या साथीदारांचे मृतदेह नेल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
हिडमाच्या बटालियनमध्ये ८०० नक्षलवादी
हिडमाच्या सुरक्षेत नक्षलवाद्यांची सर्वात घातक टीम असते. ही टीम अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असते. या टीममध्ये जवळपास ८०० नक्षलवादी होते. त्यांनी आमच्यावर डोंगरांवरून हल्ला केला, असं चकमकीतील एका जवानाने सांगितलं. हिडमा ही छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आश्रय घेत असते. घटनेचे स्थळ हे तेलंगणला लागून आहे.
छत्तीसगड नक्षलवादी हल्ला; २२ जवान धारातीर्थी, PM मोदींचा इशारा
रॉकेट लाँचरने हल्ला
हिडमासोबत असलेल्या अनेक नक्षलवाद्यांकडे अनेक अत्याधुनिक हत्यार आहेत. अनेक राज्यांचे पोलिस हिडमाच्या शोधात आहेत. तरीही ती तावडीत येत नाहीए. त्यांनी जवानांवर रॉकेट लाँचरने हल्ला केला. यूबीजीएल, रॉकेट लाँचर, आणि इन्साससह एके-४७ रायफलींनी नक्षलवाद्यांनी वेढा घालून १०० ते २०० मीटर अंतरावरून गोळीबार करत होते, अशी माहिती जखमी जवानाने दिली.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment