चिपळूण तालुक्यातील पिंपळी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षिय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू




 चिपळूण तालुक्यातील पिंपळी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षिय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू



रत्नागिरी:-चिपळूण तालुक्यातील पिंपळी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षिय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील खबर देणार अक्षय जितेंद्र चव्हाण, वय-२२, रा.पिंपळी खुर्द, ता.चिपळूण याचा भाऊ दिनेश जितेंद्र चव्हाण, वय- १६ वर्षे हा दिनांक २ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या मित्रांसोबत पिंपळी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तेथून तो पाण्यातून वाहुन जाऊन नापत्ता झाला होता. म्हणून चिपळूण पोलिस ठाणे येथे कळविण्यात आले होते. त्याचा शोध घेत असताना दिनेश जितेंद्र चव्हाण याचे प्रेत वाशिष्ठी नदीत खेर्डी रेल्वे ब्रिजखाली मिळून आले. या घटनेचा तपास पोलिस हेडकॉंस्टेबल आंबेरकर करित आहेत. 



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments