बंद खोलीत 'ती' आत्महत्या करत होती, सासरची मंडळी खिडकीतून व्हिडिओ शूट करत होते
बंद खोलीत 'ती' आत्महत्या करत होती, सासरची मंडळी खिडकीतून व्हिडिओ शूट करत होते
मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका विवाहितेने बंद खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी महिला आत्महत्या करत होती, त्यावेळी तिला वाचवण्याऐवजी तिच्या सासरची मंडळी या घटनेचा व्हिडिओ बाहेरून काढत होते. इतकेच नाही तर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टही केला.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दुसरीकडे मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी सासरकडील मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हुंडाबळीची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.ही घटना मुजफ्फरनगरमधील छपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दतियाना गावात घडली. कोमल नावाच्या विवाहितेने बंद खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल ही शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलडी गावात राहात होती. तिचे लग्न दोन वर्षांपूर्वी दतियाना गावातील आशिष याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर तिच्या सासरची मंडळी हुंड्याची मागणी करत होते, तसेच तिला मारहाण करत होते, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर त्यांच्या छळाला कंटाळून रविवारी कोमल हिने आत्महत्या केली, असा आरोपही तिच्या मात्यापित्यांनी केला आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment