अत्यावश्यक व जीवनावश्यक प्रमाणे सर्व व्यापारी आस्थापने उघडणेसाठी परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन


                                                                    (छाया - तय्यब अली)
                                                                    

कोल्हापूर :  (प्रतिनिधी) दि.७. महाराष्ट्र शासनाने DMU/२०२०/CR.९२/DisM-१ या दि. ०४ एप्रिल २०२१ च्या परिपत्रकानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक जा.क्र.नैआ/कोरोना विषाणू/आरआर/१०८/२०२१ प्रमाणे संपुर्ण राज्यामध्ये दि. ०५ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून ते दि. ३० एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापना यांना संचारबंदी लागू केलेली आहे. 
यासंदर्भात दि. ०५ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटील, मा. नाम. हसन मुश्रीफ, मा. नाम. राजेंद्र पाटील- यड्रावकर तसेच मा. दौलत देसाई, जिल्हाधिकारी, मा. कादंबरी बलकवडे, आयुक्त, को.म.न.पा., मा. शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व संबधीत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटना यांच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली होती. 
या भेटीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटनांचे पदाधिकारी यांनी सदर परिपत्रकामधील ‘सर्व व्यापारी आस्थापना (अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवा,’ या निर्णयाचा कडाडून विरोध केला. ‘सर्व व्यापारी अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला व्यापाऱ्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. कारण ‘कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना या “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या योजनेअतंर्गत शासनाने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा कोरोना रुग्णामध्ये सर्वात शेवटी आहे.’ असे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. जर ‘तुम्ही सर्व व्यापारी अस्थापना सुरू असताना कोणती कारवाई केली तर आम्ही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुध्दा बंद ठेवू.’ असा इशारा सर्व सलंग्न संघटना यांच्यातर्फे मा. संजय शेटे यांनी प्रशासनाला दिला. यावर पालकमंत्री मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटील व मा. नाम. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटना यांचेकडे एक दिवसाची मुदत मागून घेवून उद्या दि. ०६ एप्रिल २०२१ रोजी योग्य तो निर्णय देऊ असे अश्वासन दिले. 
काल दि. ०६ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनाचे पदाधिकारी यांना मा. शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधिक्षक, कोल्हापूर यांनी सर्व व्यापारी आस्थापने (अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवावीत असा शासनाचा निर्णय झाला आहे. तरीसुध्दा आपल्या चेंबरमार्फत सर्व व्यापारी आस्थापने सुरू करण्यात आलेली आहेत, यासबंधी चर्चा करणेसाठी बोलावून घेतले होते. या चर्चेमध्ये मा.अधिक्षक यांनी ‘सर्व व्यापारी आस्थापने (अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवावीत. तसेच, उद्या दि. ०७ एप्रिल २०२१ रोजी पालकमंत्री, मंत्रीमहोदय व प्रशासनाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ’ असे आवाहन केले.
त्यानुसार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, सर्व सलंग्न संघटना व व्यापारी यांचेमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये दुपारी ३.०० नंतर आपली सर्व व्यापारी आस्थापने (अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवावीत, असा निर्णय झाला. त्याप्रमाणे, शहरामधील सर्व व्यापारी यांनी मोठ्याप्रमाणात प्रतिसाद देवून आपली सर्व व्यापारी आस्थापने बंद ठेवली.  
वरील पालकमंत्री, मंत्रीमहोदय व प्रशासनाच्या विनंतीस मान देवून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटना यांनी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व व्यापारी आस्थापने एक दिवसासाठी बंद ठेवली होती. परंतू, लॉकडाऊनबाबत राज्यातील नागरीक व व्यापाऱ्यांची नाराजी तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड१९ रूग्णांची संख्या यांचा विचार करता, उर्वरित सर्व आस्थापने देखील देशाची अर्थव्यवस्था बळकट करणेसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु ठेवणेसाठी परवानगी द्यावी ही अशी विनंती यावेळी या निवेदनाद्वारे करणेत आली.
    यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील मानद सचिव धनंजय दुग्गे व जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने व प्रदीपभाई कापडीया,  संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे,  भरत ओसवाल, संपत पाटील, संभाजी पोवार, तसेच जयंत गोयानी व कुलदीप गायकवाड उपस्थित होते.







...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments