रत्नागिरी शहरात कोरोना रुग्ण सापडल्यास त्या इमारतीचे तात्काळ निर्जंतुकीकरण करणार
रत्नागिरी शहरात कोरोना रुग्ण सापडल्यास त्या इमारतीचे तात्काळ निर्जंतुकीकरण करणार- नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी
रत्नागिरी:-रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे़. रत्नागिरी शहर परिसरातील सर्व शासकीय कार्यालये परिसरांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे़. शहरातील एखाद्या इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यास नागरीकांनी थेट नगर परिषदेशी संपर्क साधावा़. तात्काळ ती इमारत नगर परिषदेकडून निर्जंतुकीकरण करुन दिली जाईल असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले़.नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी म्हणाले की, कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने नगर परिषद शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करणार आहे़. शहरात विनामास्क फिरणा-यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई सुरु करण्यात आली आहे़. तसेच नागरीकांनी गर्दी करु नये़, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना आम्ही देत आहोत़.अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही मास्कचा वापर करावा़. ग्राहकांनाही मास्कची सक्ती करावी असे आवाहन साळवी यांनी केले़. ते पुढे म्हणाले की, शहरामध्ये एखाद्या इमारतीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला तर तेथील नागरीकांनी नगरपरिषदेला 02352 - 223576 वर संपर्क करुन माहिती द्यावी़. त्या इमारतीचे तात्काळ निर्जंतुकीकरण करण्यात येईल़. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नगरपरिषदेच्या आरोग्यमंदिर येथील इमारतीतही कोरोनावर उपचार सुरु करण्यात येणार आहेत़. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चर्मालय येथील स्मशानभूमीचा वापर केला जाणार आहे़. अन्य कारणाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर मिरकरवाडा येथील स्मानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे साळवी यांनी सांगितले़. गेले दोन दिवस रत्नागिरी शहरात पाणी पुरवठा बंद होता़. आजपासून तो पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे़. सध्या पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळे शहरवासियांना गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे़. त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो़. पण त्यानंतर मात्र शहरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा सुरु होईल़. शहरातील रस्त्यांची कामेही सुरु होणार असून सुरुवातीला ज्या परिसरात रस्ते करणे अतिशय गरजेचे आहे तेथील रस्त्यांना प्राधान्य दिले जाईल असे प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले़. रत्नागिरी शहरात काही परिसरात पुन्हा एकदा फूटपाथवर अतिक्रमणे सुरु झाली आहेत़. ही अतिक्रमणे हटवण्याची मोहिम लवकरच सुरु होणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष साळवी यांनी दिला़. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगरसेवक राजन शेट्ये, निमेश नायर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित होते़.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment