यवतमाळमध्ये करोना रुग्णांचे हाल, खाटांअभावी अनेक रुग्णांना उपचाराची प्रतीक्षा




 यवतमाळमध्ये करोना रुग्णांचे हाल, खाटांअभावी अनेक रुग्णांना उपचाराची प्रतीक्षा



यवतमाळ:यवतमाळ जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू असून आता करोनाबाधित रुग्णांना शासकीय आणि खासगी कोविड उपचार रुग्णालयांमध्ये जागा मिळणे दूरपास्त झाले आहे. गेल्या वर्षभरातील करोनाबाधित आणि मृतांचे सर्व विक्रम आज मंगळवारी मोडीत निघाले. २४ तासात जिल्ह्यात तब्बल २३ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ९५३ नवे बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या आठवड्यात वाढलेल्या रूग्णसंख्येमुळे शासकीय आणि खासगी अशा दोन्ही कोविड रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिसरात करोनाबाधित रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत फिरत असल्याचे विदारक चित्र आहे.अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक सर्व राजकीय, सामाजिक शक्ती वापरुन कुठे अ‍ॅडमिट व्हायला खाट मिळेल का हो, असा टाहो फोडताना दिसत आहेत. मात्र सर्वत्र रुग्णांवर वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. शासकीय दवाखान्यातील फिवर क्लिनिकसमोर तर रुग्णांना रस्त्यावरच तपासून ऑक्सीजन लावण्यात येत असल्याचे चित्र हमखास दिसते.वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू देखील होत आहे. करोनाच्या भयाने असंख्य व्यक्ती घरीच उपचार करून घेत आहेत. नंतर प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी उशिरा रूग्णालयात दाखल होत असल्याने कोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.रूग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याची भयावह स्थिती असल्याने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरसकट परवानगी देण्याची मागणी होत आहे. यवतमाळात उपचार होत नसल्याने अनेक रुग्ण नागपूर, अमरावती, नांदेड आदी ठिकाणी जात आहे.




'केवळ ५७७ खाटा कोणा कोणाला पुरणार?'


यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ५७७ खाटा आहेत. सध्या संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा केवळ कोविडवरील उपचारांवर लक्ष केंद्रित करून आहे. यवतमाळ येथे नव्यानेच बांधण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये करोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी ५७७ खाटा असून, ४९० ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा, ९९ कृत्रिम जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे यांनी दिली.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, अपुरे संख्याबळ असल्याने यंत्रणा हतबल आहे, असे डॉ. कांबळे म्हणाले. जिल्ह्यात १७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. तिथे १४७ नियमित खाटा, तर २७८ ऑक्सीजन सुविधेच्या खाटा आहे. जिल्ह्यातील दारव्हा, पुसद, पांढरकवडा, वणी उपजिल्हा रुग्णालयात ९० खाटा आहेत. या सर्व खाटा रुग्णांनी व्यापल्या असल्याने नवीन रुग्णांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments