शिवजयंतीनिमत्त अलिबाग-कुरुळ येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
शिवजयंतीनिमत्त अलिबाग-कुरुळ येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
दि . ३१ मार्च रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कुरुळ यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने शासनाकडून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.गेले दोन वर्ष मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी गडकिल्ल्यामधून शिवज्योत आणली जाते यंदा देखील सर्व नियमांचे पालन करून कुलाबा किल्ला अलिबाग येथून कुरुळ येथे शिवज्योत आगमन झाले, यानंतर नियमित प्रमाणे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुष्पहार घालुन पुजा करण्यात आली या वर्षी कोरोनामुळे अत्यंत भयानक परिस्थिती उद्धभवल्याने अनेक लोकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले त्यातच रक्ताचा जाणवत असणारा तुटवडा तसेच मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत एक सामाजिक बांधिलकी जपत यावर्षी सार्वजानिक शिवजयंती उत्सव समिती कुरुळ आयोजित गुरुपौर्णिमा मित्रपरिवार, ॲड. जनार्दन पाटील मित्रमंडळ, संघर्ष सुशिक्षित बेरोजगारांची सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि ग्रामस्थ मंडळ कुरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला सर्व मंडळातील सदस्यांनी व ग्रामस्थांनी उस्पूर्त प्रतिसाद नोंदवला होता या वर्षी सार्वजानिक शिवजयंती उत्सव समितीला ३७ वर्ष पूर्ण झाल्याने एकूण ३७ रक्तदात्यानी रक्तदान देऊन एक आगळा वेगळा संदेश या माध्यमातून देण्याच्या प्रयत्न केला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुरुळ गावचे विद्यमान सरपंच ॲड. जनार्दन पाटील, मा. जिल्हा सरकारी वकील श्री. ॲड. प्रसाद पाटील, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा संक्रमण अधिकारी व त्यांचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य कुं. आकाश घाडगे, श्री.रुपेश म्हात्रे, श्री. अवधूत पाटील, सार्वजानिक शिवजयंती उत्सव समितीचे श्री. प्रवीण पाथरे, श्री. नारायण म्हात्रे, श्री. राकेश पाटील, मिलिंद म्हात्रे, कु. मयुर गायकर, कु. योगेश घाडगे, प्रमोद पाथरे,शुभम पाथरे, कु. विवेक पाटील .पत्रकार राजेश बाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.सार्वजनिक शिवजयंती उत्सव कुरुळ भव्य रक्तदान शिबीर निमित्ताने प्रत्येक रक्त दात्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment