यवतमाळमध्ये खळबळ; कोविड सेंटरमधून ३० रुग्णांनी पलायन केले आणि...
यवतमाळमध्ये खळबळ; कोविड सेंटरमधून ३० रुग्णांनी पलायन केले आणि...
दरम्यान, शनिवारी कोविड केअर सेंटर मधून ३० करोना बाधित पळून गेल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीन सरकली. पलायन केलेले रुग्ण कोणत्या एका गावातील आहेत की, अनेक गावातील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तालुका आरोग्य यंत्रणेने या रुग्णांचा गावागावात आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक,अंगणवाडी व आशा सेविका यांच्यामार्फत शोध घेणे सुरू केले आहे. पलायन केलेल्यांपैकी सापडलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुराम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
संबंधितांविरोधात कारवाई करणार: जिल्हाधिकारी
घाटंजी कोविड केअर सेंटरमध्ये घडलेला प्रकार संतापजनक आहे. या पद्धतीने वर्तन राहिल्यास जिल्ह्यात संसर्ग आणखी वाढेल. त्यामुळे पळून गेलेल्या रुग्णांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारीअमोल येडगे यांनी दिली. याप्रकरणात दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा दुजोरा
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा