कोल्हापूर शहरातील श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडील मणकर्णिका कुंडाबाबत बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर शहर येथील करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार लगत असलेला मणकर्णिका कुंड मूळ स्वरूपात आणण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. सदर कामाबाबत आज दिनांक 1- 4 - 20 21 रोजी गरुड मंडप येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये कुंडाचे झालेले काम व पुढील करावयाचे काम त्यावर चर्चा झाली. सदर बैठकीमध्ये कुंडाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वात मोठा अडथळा असलेली माऊली लॉज इमारतीच्या अतिक्रमण व त्यामुळे मला त्याच्या बाजूचा भराव काढण्याचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे कुंडाचे संवर्धन करण्याचे कामामध्ये अडथळा येणार आहे.
सदर कामी खुदाई केली माती ही चाळून घेणे, त्यामध्ये आणखी काही वस्तू सापडतात का याचा शोध घेणे, तसेच माती मध्ये असलेले दगड स्वतंत्र करणे, सदर दगड हे मणकर्णिका कुंडाच्या संवर्धनाकरिता वापरण्याचे नियोजन करणे, यावर चर्चा होऊन सदर माती चाळून घेण्याचे कामास सुरुवात करण्याचे ठरले.
तसेच पूर्व दरवाजामधून मंदिरामध्ये येणारे पाणी रोखणेकरिता कोल्हापूर महानगरपालिकेकडून अंदाजपत्रक प्राप्त झाले असून सदर कामाकरिता निधी देवस्थान समितीकडून उपलब्ध करून देणे बाबत विनंती केली आहे. परंतु सदर काम कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेने मा. प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचे ठरले. त्यानुसार महेश जाधव (अध्यक्ष- देवस्थान समिती) यांनी प्रशासक यांची तात्काळ वेळ घेतली व सदरची बैठक संपल्यानंतर मा. प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांची भेट घेतली. सदर भेटीवेळी मंदिराकडील माऊली लॉज बाबतचा विषय, तसेच पूर्व दरवाजातील गटरचा विषय, तात्काळ मार्गी लावणे बाबत सुचित केले. तसेच महाद्वार दरवाजा ते महाद्वार चौक या रस्त्याचे सुशोभीकरण करणे, करिता देवस्थान समिती तयार असून महापालिकेने परवानगी द्यावी असे विषय मांडले. याबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे मा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांनी सूचित केले. सदर बैठकीस महेश जाधव (अध्यक्ष- देवस्थान समिती) मा.सौ. वैशाली शिरसागर (कोषाध्यक्ष) श्री. शिवाजी बाबुराव जाधव (सदस्य- देवस्थान समिती) श्री राजेंद्र नारायण जाधव (सदस्य- देवस्थान समिती) श्री. चारुदत्त रमाकांत देसाई (सदस्य- देवस्थान समिती) श्री विजय पवार (सचिव) श्री. सुदेश देशपांडे (विशेष प्रकल्प अभियंता) श्री. सुरेश पाटील (प्रकल्प उपअभियंता) श्री. धनाजी जाधव (व्यवस्थापक श्री. करवीर निवासिनी मंदिर) तसेच मणकर्णिका कुंड खुला करणे, गठीत समितीचे सदस्य वास्तुविशारद श्रीमती अमरजा निंबाळकर, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडील प्रतिनिधी श्री. उत्तम कांबळे, श्री. गणेश नेर्लेकर - देसाई, श्री. उमाकांत राणींगा हे उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment