लुटण्याचा उद्देशाने व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला




  लुटण्याचा उद्देशाने व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला 



 रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्च रोड येथे किराणा माल व्यापारी रमीझ हजीहबीब आकवानी किराणा व भाऊ वसीम या दोघांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न झाला. हे दोघेही काल रात्र 9 च्या सुमारास जुने भाजी मार्केट येथील आपले किरणामालाचे दुकान बंद करून आपल्या माजगाव रोड येथील घरी दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. चर्च रोड येथील गतिरोधक जवळ दुचाकी आली असता पाठ करून उभ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीने अचानक या दोघांवर दांडक्याने हल्ला केला व हातातली पैशाची बॅग पाळवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात भाऊ वसीम जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments