कोरोना साथरोग मध्ये जिल्हा क्षयरोग केंद्राचे काम कौतुकास्पद : दौलत देसाई


                                                        (छाया - तय्यब अली)
कोल्हापूर : जिल्हा क्षयरोग केंद्राचे कोरोना साथरोग कालावधीमध्ये कौतुकास्पद काम केले आहे. कोल्हापूर ग्रामीण मध्ये कोविड बरोबरच क्षयरोग निदान करण्यात एकाच वेळी करण्यात येते. त्यामुळे क्षयरोगाचे लवकर निदान होत आहे. तसेच विविध उपयोजना राबवल्यामुळे प्रसार कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी  डॉ. दौलत देसाई यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर आयोजित जागतिक क्षयरोग दिनच्या कार्यक्रमात शाहु स्मारक येथे प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. गेल्या वेळेच्या कोरोना काळाची इतिहासाची पुनरावूत्ती होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी.  कोरोना  मृत्युदर जास्त आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापुर जिल्यात लसीकरण दर वाढविला आहे. दर आठवड्याला ३ लाख लोकांना लसीकरण करण्याचे  उदिस्त ठेवले आहे .आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावे लागेल.समाजामधील सर्व घटकांनी मिळून कोविड-टी.बी. बद्दल जनआंदोलन  उघडले तरच या  आजारावर आपण विजय मिळऊ शकतो . आपल्याकडे शासकीय विभागात कोविड-टी.बी बद्दल अत्यंत उच्च दर्जाचे निदान तंत्रज्ञान  मोफत उपलब्ध आहे .याचा लाभ सर्व लोकानी करून घ्यावा असे आवाहन  त्यांनी केले.

 जिल्हा स्तरीय सर्व अधिकारी मार्गदशनाने व सल्ल्याने  जिल्हा क्षयरोग केंद्राने विविध उपाययोजना राबवुन  मा. जि आरोग्य क्षयरोग अधिकारी यांनी  क्षयरुग्ण निदान दर कमी केल्यामुळे सबनेशनल व्हेरिफिकेशन (टी.बी.फ्री स्टेटस)  अंतर्गत, कोल्हापूर ग्रामीणला सिल्वर मेडल सर्टीफीकेशन प्रदान करून गौरवण्यात आले..या बद्दल त्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी. कुंभार यांचे व सर्व स्टाफ यांचे विशेष अभिनंदन त्यांनी केले.

यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या

news.mangocity.org