चक्क डोळे बांधून दुचाकीवरून दहा हजार कि.मी.चा प्रवास


(छाया - तय्यब अली)

कोल्हापूर : कोरोना बचाव, वाहतूक सुरक्षा,पर्यावरण बचाव, प्लॅस्टिक विरोध याबाबत जनजागृती करणेसाठी  तेलंगणा ते कन्याकुमारी  ते काश्मीर पर्यंत 10,000 कि.मी. चा प्रवास  डोळे झाकून दुचाकीवरून प्रवास करणारे जादूगार जी. रामकृष्ण आज कोल्हापूर मध्ये पोहचले. त्यांचा हा प्रवास त्यांनी हैद्राबादमधील चार मिनार येथून सुरू केला. या संदेश यात्रेचे उदघाटन तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अलीगुरु यांचे हस्ते करणेत आले होते.  जादूगार   रामकृष्ण यांचे सोबत टी.पृथ्वी, जी.श्रीनाथ असून त्यांचा हा प्रवास कोल्हापूर मधून पुढे पूणे,मुंबई, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश करून काश्मीर येथे त्यांची संदेशयात्रा पोहचणार आहे. 

   जादूगार जि, रामकृष्ण हे 5000 कि.मी.चा  प्रवास करत दि. 01-04-2021 रोजी कोल्हापूरात पोहचले. यावेळी त्यांनी दसरा चौकातील छ.शाहू महाराजांना अभिवादन केले.  याठिकाणी कोल्हापूर मधील नौशाद मोमीन व जादूगार  कालीचरण यांनी त्यांचा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. व पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. 







...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments