नाचणे येथे सोसायटीच्या मिटिंगमध्ये महिलेला मारहाण






  नाचणे येथे सोसायटीच्या मिटिंगमध्ये महिलेला मारहाण



 रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील सोसायटीच्या मिटिंगमध्ये प्रौढ महिलेला मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुमारास घडली. राहुल वासुदेव फडके (रा.नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित महिलेले दिलेल्यात तक्रारीनसार, त्यांच्या सोसायटीची सकाळी मिटिंग होती. त्यावेळी सोसायटी इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये गाड्या पार्क करण्यावरुन त्यांच्यात आणि राहुल फडके यांच्यामध्ये वाद झाला. या वादातूनच राहुलने प्रौढेला हातांच्या थापटांनी मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटून नुकसानही झाले. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या