धक्कादायक! पोलिसाच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न




 धक्कादायक! पोलिसाच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; सप्तकनगरमधील थरारक घटना



नागपूर: घराला आग लावून पोलिसाच्या कुटुबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर येथे मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांचे कुटुंबीय दहशतीत आहे. राहुल चव्हाण हे पोलिस मुख्यालयात कार्यरत असून, सध्या ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटर येथे तैनात आहे. सोमवारी रात्री राहुल हे कोव्हिड सेंटर येथे गेले. राहुल हे कोव्हिड सेंटरवर गेल्यानंतर घरी त्यांच्या पत्नी पुनम , मोठा मुलगा राघव (वय ६) लहान मुलगा केशव (वय ३) हे घरी होते.पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने दरवाजाला बाहेरुन कडी लावली. दरवाजा व घरावर रॉकेल टाकून आग लावली. घरात धूर झाल्याने पुनम यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या जाग्या झाल्या. त्या घाबरल्या. सावधगिरी बाळगत त्यांनी दोन्ही मुलांना जागे केले. दोघांना स्नानगृहात नेले. त्यानंतर त्या स्वयंपाक घरात आल्या. स्वयंपाक घरातील साहित्यही जळत होते.पुनम यांनी लगेच राहुल व शेजारी राहणारे मामा नामदेव राठोड यांच्या मोबाइलवर संपर्क साधून घराला आग लावण्यात आल्याची माहिती दिली. पुनम यांनी आग विझवायला सुरूवात केली. याचदरम्यान त्यांचे मामा तेथे पोहोचले.त्यांनी शेजाऱ्यांना जागे केले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझविली. मामा यानी दरवाजा तोडला. पुनम व त्यांच्या मुलांना घराबाहेर काढले.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. पुनम चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments