बेपत्ता 'कोब्रा' कमांडो राकेश्वर सिंह यांचा माओवाद्यांनी धाडला फोटो




बेपत्ता 'कोब्रा' कमांडो राकेश्वर सिंह यांचा माओवाद्यांनी धाडला फोटो



बीजापूर / जम्मू : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या आणि 'कोब्रा' टीमचे कमांडो राकेश्वर सिंह यांचा एक फोटो समोर आला आहे. राकेश्वर सिंह हे आपल्या ताब्यात असल्याचा दावा माओवाद्यांनी बीजापूरचे पत्रकार गणेश मिश्र यांच्याशी बोलताना केलाय. नक्षलवाद्यांनी गणेश मिश्र यांना कमांडर राकेश्वर सिंह यांच्या फोटोसोबत एक पत्र पाठवून आपल्या अटीही समोर मांडल्या आहेत.'बुधवारी सकाळी माओवाद्यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधला. राकेश्वर सिंह हे आमच्या ताब्यात सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुराव्यासाठी त्यांनी राकेश्वर सिंह यांचा एक फोटोही पाठवला आहे' असं गणेश मिश्र यांनी म्हटलंय. माओवाद्यांकडून पाठवण्यात आलेल्या फोटोत राकेश्वर सिंह कॅम्पमध्ये बसलेले दिसत आहेत.बेपत्ता झाल्यानंतर राकेश्वर सिंह यांचा हा पहिलाच फोटो आहे. आपल्याशी चर्चा करण्यासाठी सरकारनं मध्यस्थांना पाठवावं, तेव्हाच राकेश्वर मिश्र यांची सुटका केली जाईल, असं या पत्रात माओवाद्यांनी म्हटलंय.दुसरीकडे, जम्मूचे रहिवासी असणाऱ्या राकेश्वर सिंह मनहास यांच्या कुटुंबानं सरकारकडे याचना केलीय. लवकरात लवकर पावलं उचलून सरकारनं राकेश्वर सिंह यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांची पत्नी मीनू मनहास यांनी केलीय.'जर एखाद्या जवानानं सुट्टी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीही रिपोर्ट केला तर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाते. इथे एक जवान ३ एप्रिलपासून बेपत्ता आहे परंतु, सरकार मात्र कोणतंही पाऊल उचलताना दिसत नाही. सरकारनं मध्यस्थांना पाठवून राकेश्वर सिंह यांची सुटका करावी', असंही त्यांनी म्हटलंय.मात्र, माओवाद्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. या दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी सुरू अस्लयाचं सुरक्षा दलाकडून सांगण्यात येतंय.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments