काजूच्या बागेची साफसफाई करताना लावलेल्या आगीत प्रौढाचा होरपळून मृत्यू




काजूच्या बागेची साफसफाई करताना लावलेल्या आगीत प्रौढाचा होरपळून मृत्यू


संगमेश्वर : बामणोली येथे काजूच्या बागेची साफसफाई करताना लावलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा दुदैवी मृत्यू झाला. संजय विठ्ठल लोकम (वय ४९, रा. करंडेवाडी-बामणोली, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याची खबर संजयचा भाऊ विजय लोकम यांनी दिली. संजय हे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काजूची बाग साफ करण्यासाठी गेले होते; मात्र ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घरी आलेच नाहीत, म्हणून संजय यांचा भाऊ विजय हे त्यांना बघायला गेले. काजूच्या बागेच्या दिशेने जात असतानाच संजय हे आगीत होरपळलेल्या स्थितीत दिसून आले. विजय यांनी वाडीतील ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संजयला मृत घोषित केले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Comments