खेड एस टी आगारा कडून महिलांची हेळसांड
खेड एस टी आगारा कडून महिलांची हेळसांड
प्रवासी वर्गाकडून व्यक्त होते नाराजी
खेड:-काल दिनांक 6/4/2021 रोजी दुपारी खेड पन्हाळजे एस टी 1:45 वाजता सुटली व ती बहिरवली 3 पर्यत जाऊन परत खेड कडे वळवण्यात आली या वेळी सदर एस टी मध्ये प्रवास करणार्या 7 महिला यांनी वाहक श्रीमती एस पी देवकर यांना विनंती करून सुद्धा त्यानी व चालक आर के जाधव यांनी मनमानी करत महिलां जवळ अवाच्छ भाषा वापरली या प्रवाशांमध्ये पन्हाळजे गट पंचायत समिती सदस्या समीक्षा जाधव ह्या देखील होत्या त्यांनी विनंती करून देखील वाहक व चालक हे उद्धट पणे बोलत होते त्याच्या बोलण्यातून आले की आम्हाला कंट्रोल प्रमुख एम डी परकर यांनी सुचना दिल्या आहेत व त्या नुसार आम्ही एस टी खेड च्या दिशेने न्हेत आहोत व सदर च्या महिलांना बहिरवली 3 ते पन्हाळजे असा 12 किलो मिटर चालत प्रवास करावा लागला. या प्रकरणाची चौकशी डेपो मॅनेजर श्री करवंदे यांनी करावी अशी मागणी शहराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे व श्री संजय गोलटकर यांनी केली व चौकशी करून संबंधित अधिकारी चालक वाहक यांच्या वर कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे सदर प्रकरण हे आमदार भास्करराव जाधव व परिवहन मंत्री अनिल परब व संजयराव कदम यांना कळवण्यात आले आहे महिलांची होणारी हेळसांड थांबवावी अशी विनंती केली आहे.
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment