कोल्हापूरात कोरोना नियंत्रणात, पण निष्काळजीपणा वाढतोय

(छाया - तय्यब अली)

कोल्हापूर : (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. पण रुग्ण दररोज वाढत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने जिल्हा परिषदा, महानगरपालिका बरोबर इतर संबंधित विभागाने तयारी केली आहे. परंतु पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरात कोरोणाने गंभीर रूप धारण केले असून, तिथे काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सर्व तालुक्यातील कामगार आपापल्या गावी परतत आहेत .

. तशी त्या व्यवस्थेने परवानगीही दिली आहे.  हे कामगार परतत असताना जिल्ह्याच्या सीमेवर अजून पर्यंत तरी आरोग्य तपासणी केंद्रे नाहीत. त्यामुळे विना तपासणी हे कर्मचारी आपापल्या गावी परतत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात हा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याची त्या-त्या विभागाने काळजी घेणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर शहरातील होणारी गर्दी ही चिंतेची बाब बनली आहे. आठवडी बाजाराबरोबर सर्वच बाजारात गर्दी करताना मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर वापर हे नियम पाळले जात आहेत. शहरातील महत्त्वाच्या खरेदी रस्त्यावर ग्राहक व विक्रेते यांच्यात कुठलेच नियम पाळले जात नाहीत. असे दिसून येते. यामुळे शहराची परिस्थिती गंभीर होऊ लागली असून, दररोज 100 च्या पटीत रुग्ण वाढताना दिसत आहे. हे ही शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाने सर्व शासकीय, खाजगी हॉस्पिटल येथील नर्सेस, डॉक्टर व कर्मचारी वर्गात पूर्ण तयारीत आहेत. परंतु रुग्ण वाढले, तर त्या पटीत डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडण्याचा काही धोका आहे. मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, येणाऱ्या संभावित गंभीर परिस्थितीचा विचार करून, आपण स्वतः आपल्या कुटुंबीयांची तसेच इतरांचीही कोरना विरोधी नियमांची अंमलबजावणी करत या दुसऱ्या लाटेस परतवून लावू शकतो. जिल्ह्यातील शासकीय व्यवस्थेने बाहेरून येणाऱ्या कामगार ग्रामीण भागात परतलेल्या कामगारांचा शोध घेऊन त्यांच्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग करून तपासण्या करणे, आवश्यक आहे. शासकीय व्यवस्था, आपण स्वतः तसेच आरोग्य व्यवस्था त्यांनी एकमेकास सहकार्य करत हा लढा सुरु ठेवला, तर कोरूनाची दुसरी लढाई सीमेवरून परत पाठवू शकतो. 


 या छ. शाहूंच्या  कोल्हापूर जिल्ह्यात  अशक्य ते शक्य करण्याचे बळ निश्चितच आहे. फक्त आपण आपली सुरक्षा व जबाबदारी आपणच घेणे गरजेचे आहे. 



                            (छाया - तय्यब अली)



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments