व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला




व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला



रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा येथे दुकान मालकाला पिस्तुलचा धाक दाखवून एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्या प्रकरणातील तीन संशयितांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हि घटना ६ मार्च रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भेराराम ओखाजी सुन्देशा (३८ रा.खेडशी, रत्नागिरी) हे ६ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात हिशोब तपासात असताना किशोर कांतीलाल परमार (30, सध्या रा.सिंधुदुर्ग मुळ रा.राजस्थान), अणदाराम भुराराम चौधरी (29, सध्या रा.बेळगाव मुळ रा.राजस्थान) आणि ईश्वरलाल तलसाजी माझीराणा (21, रा.राजस्थान) यांनी दुकानात घुसून भेराराम यांना पिस्तुलचा धाक दाखवला होता. त्यानंतर त्यांच्याकडील रोख 15 हजार रुपये, सोन्याची अंगठी, मोबाईल, सीसीटिव्ही डिव्हिआर असा एकणू 52 हजार रुपयांचा मुद्देमाल घेउन गाडीतून पळ काढला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यातील तीन संशयीत आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या होत्या. सदरील तीन संशयितांनी जामिनासाठी न्यायलयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देऊन तिघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments