अनधिकृत धंदे करणाऱ्यांना आता महाराष्ट्रात मोकळीक
अनधिकृत धंदे करणाऱ्यांना आता महाराष्ट्रात मोकळीक
निलेश राणे यांची आघाडी सरकारवर खोचक टीका
रत्नागिरी:-जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये २५०० किलो बीफ मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी पकडलं. अनधिकृत धंदे करणाऱ्यांना आता महाराष्ट्रात मोकळीक असल्यामुळे कोकणामध्ये पण हे बोके धिंगाणा घालू लागले. कोकणामध्ये या भानगडी नव्हत्या पण सगळे चोर एकत्र आल्यामुळे हे चालू झालं. अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केली आहे.दापोली येथील कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने सुमारे अडीच हजार किलो गोवंशीय मांसासह दोघाना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी दोघांकडील बोलेरो गाडी तसेच हत्यारही जप्त करण्यात आली आहेत. १० ते १२ बैलांची तर दोन-तीन म्हैशींची कत्तल करून हे गो वंशीय मास मुंबईत घेऊन चालले होते. यावेळी कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने केलेल्या या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे. यावर निलेश राणे ट्विटद्वारे म्हणाले की, अनधिकृत धंदे करणाऱ्यांना आता महाराष्ट्रात मोकळीक असल्यामुळे कोकणामध्ये पण हे बोके धिंगाणा घालू लागले आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment