आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी सचिन वाझे चालवत असल्याचा NIA ला संशय


मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या रात्री स्फोटकं ठेवण्यात आली. त्या रात्री आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी मुलुंड टोलनाक्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. ही गाडी स्वतः सचिन वाझे चालवत असल्याचा संशय एनआयएला आहे. तसेच 25 फेब्रुवारी रोजीचं रात्री एक वाजून 20 मिनिटांचं मुलुंड टोलनाक्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी दिसत आहे. 

याप्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर पार्क करुन आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला होता, ती गाडी मुलुंड टोल नाका पार करताना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. पण त्या पुढील टोल नाक्यावर ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नाही. दरम्यान, मुलुंड टोलनाक्यापुढे पडघा टोल नाका येतो आणि इनोव्हा गाडी हाच टोलनाका पार करताना दिसत नाहीये. तपास यंत्रणांनी पडघा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा तपासलं परंतु, ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नव्हती. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121



टिप्पण्या