इंधन झालं स्वस्त ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
इंधन झालं स्वस्त ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दर कपात केली आहे. आज देशभरात पेट्रोल २२ पैसे आणि डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केले होते.सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून ग्राहकांना आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आजच्या दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.आज मंगळवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे.गेल्या आठवड्यात कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात कपात झाली होती. कंपन्यांनी बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. तर गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त केले होते. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले होते. तर त्यानंतर सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी झाल्याने कंपन्यांनी दर कपातीचा निर्णय घेतला. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.३० डॉलरने वधारला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ६५.१२ डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.२६ डॉलरच्या तेजीसह ६१.८२ डॉलर झाला.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment