राजापूरातील धाऊलवल्ली पारवाडी येथे जंगलामध्ये शिकारीच्या बहाण्याने घेऊन जाऊन अनिल शंकर भालवलकर यांची बंदुकीची गोळी घालून निर्घृण हत्या





 राजापूरातील धाऊलवल्ली पारवाडी येथे जंगलामध्ये शिकारीच्या बहाण्याने घेऊन जाऊन अनिल शंकर भालवलकर यांची बंदुकीची गोळी घालून निर्घृण हत्या


अनिल शंकर भालवलकर यांच्या पत्नी श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र


श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केला तावडे अतिथी भवनचाही उल्लेख


रत्नागिरी:-दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी आरोपी निलेश बबन शेडेकर जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्याचा बदला घेण्याच्या हेतूने सह आरोपी संजय विठ्ठल पड्यार, अनिकेत अनंत ठुकरुल व इतर आरोपी बरोबर संगनमत करून कट करून माझे मयत पती अनिल शंकर भालवलकर वय ४१ वर्षे यांची जबरदस्तीने धाऊलवल्ली पारवाडी जंगलामध्ये शिकारीच्या बहाण्याने घेऊन जाऊन सकाळी दहा वाजता बंदुकीची गोळी घालून निर्घृण हत्या केली. तरी आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा कृत्याची सखोल तपासणी करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रत्नागिरी व पोलिस अधिक्षक रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.आरोपी निलेश बबन शेडेकर, रा.भिकारवाडी कोंडसर, संजय विठ्ठल पड्यार, रा.भिकारवाडी कोंडसर, अनिकेत अनंत ठूकरुल, रा.भिकारवाडी कोंडसर, निवृत्तीनाथ नारायण गोराठे, रा.नवेदर राजापूर, रुपेश धोंडू रांबाडे, रा.पोवारवाडी कोंडसर बुद्रुक, योगेश बाळकृष्ण रायकर, रा.भिकारवाडी कोंडसर, संदेश सूर्यकांत पोवार, रा.पोवारवाडी कोंडसर बुद्रुक, गणपत दळवी, पारवाडी, धाऊलवल्ली, सिद्धार्थ दत्ताराम तिर्लोटकर, दसुरेवाडी धाऊलवल्ली, योगेश कमलाकर गुरव, आडीवरे, राजापूर, किरण कांबळी, रा.शेडेकरवाडी, बाबा शेडेकर, शेडेकरवाडी, या सर्व आरोपींनी मिळुन संगनमताने माझ्या पतीच्या हत्येचा कट रचून बंदुकिची गोळी घालून त्यांची निर्घुण हत्या केल्याचा आरोप श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केला आहे. उमाकांत उर्फ बाळा दाते, रा.नवेदर, ता.राजापूर, संजय दाते, रा. नवेदर, ता.राजापूर, रविंद्र मारुती भोवड, रा.नवेदर, ता.राजापूर, भाई फणसे, रा.नवेदर, ता.राजापूर, प्रशांत पारकर, रा.बेनगी, ता.राजापूर हे आरोपी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते आरोपींना गुन्ह्यामध्ये मदत करत आहेत व हत्या करणा-यांना पाठीशी घालत आहेत. श्री दिलीप काळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक, नाटे पोलिस ठाणे राजापूर यांना या गुन्ह्यासंबंधी पुरेशी माहीती असतामा देखील गुन्ह्याचा योग्य तपास न करता आरोपींना कायद्याच्या चौकटीतून आणि योग्य ती कारवाई करण्यापासून वाचविण्याचे कृत्य करित असल्याचा आरोप श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केला आहे. 


हकीकत अशी की


१) निलेश बबन शेडेकर याने जमिनीच्या वादातून पूर्ववैमनश्याचा बदला घेण्याच्या हेतूने त्याचे साथीदार मुख्य आरोपी संजय विठ्ठल पक्ष्यार व २) अनिकेत अनंत ठूकरुल आणि इतर वरील आरोपी यांनी पूर्व नियोजीत संगनमताने कट कारस्थान करुन माझे पती मयत अनिल शंकर भालवलकर यांना दि.२५/०१/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास धाऊलवल्ली (पारवाडी) जंगलात जबरदस्तीने घेऊन जाऊन बंदुकीची गोळी घालून निघृण हत्या केली. त्यानंतर कोणत्याही घटनेची माहिती न देता आरोपी संजय विठ्ठल पड्यार बंदुक परवानाधारक व इतर यांनी त्यांच्या या दृष्ट कृत्याची संशय न येण्याच्या दृष्टीने मयताचे मृत शरीर आमचं घरी (मृताच्या घरी) आणून ठेवले व तेथून पलायन केले. त्यानंतर नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिलीप काळे यांनी सदर घटनेचा तपास करुन चौकशी (इन्क्वेस्ट) पंचनामा तपासणी फॉर्मसह मयताचे पोस्ट मार्टम होऊन अॅडव्हान्स सर्टिफिकेट व पोस्टमार्टम सर्टिफिकेट मिळण्याकरिता मृत शरीर सिव्हील रुग्णालय, रत्नागिरी यांचेकडे पाठविले. नाटे सागरी पोलीस ठाणे यांचेकडील दि. २५/०१/२०२१ रोजीचे वैद्यकीय अधिकारी सो., सिव्हील रुग्णालय, रत्नागिरी यांना पाठविलेले पत्र सोबत जोडले आहे. वरील गंभीर घटनेचा पोलीस अधिकारी तपास करत आहेत असे भासवत असले तरी या घटनेचा योग्य दिशेने तपास करत नाहीत असे स्पष्ट मत श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी व्यक्त केले आहे. सदर आशयाचे पत्र जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना सादर केले आहे.यासंदर्भात श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की माझ्या पतीचा मृतदेह तावडे अतिथी भवन येथे ठेवण्यात आला होता. तिथे मृतदेह धुण्यात आला. मृतदेहाला कपडे घालण्यात आले. त्यानंतर मृतदेह आमच्या घरी ठेवण्यात आला. त्यावेळी माझी सासू एकटीच घरात होती असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मला न्याय द्यावा अशी विनंती श्रीमती अविष्का अनिल भालवलकर यांनी केली आहे.





........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या