एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या गुहागरमधील नौकेवर कारवाई
एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या गुहागरमधील नौकेवर कारवाई
रत्नागिरी:-एलईडीद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना देखील नौकेवर एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या गुहागर येथील नौकेसह नौका मालकावर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. कारवाई करताना नौकेवरील एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मत्स्य विभागाच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली. नौकेवर एलईडी लाईट बसवुन मासेमारी करण्यास बंदी आहे. मंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच नौकांवर कारवाईचे आदेश देखील दिले होते. यानुसार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी, जयगड श्रीम. स्मितल कांबळे तसेच सुरक्षा रक्षक श्री. परिमल परशुराम मळेकर व श्री. सर्वेश प्रभाकर आडविरकर यांनी ही कारवाई केली. साखरीआगार ता. गुहागर जि. रत्नागिरी येथील निलेश दगडु पाटील यांच्या मासेमार नौका कृपा आई स्वामी या नौकेवर एलईडीचे साहित्य आढळून आले. या प्रकरणी सदर नौका मालकावर म. सा. मा.नि. अधि. १९८१ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. नौकेवरील एल. ई. डी लाईट्स चे साहीत्य जप्त केले असून मा. अभिनिर्णय अधिकारी, रत्नागिरी यांच्या कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत नौका जयगड बंदरात अवरुद्ध करुन ठेवण्यात आली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा