रत्नागिरी-फायरिंगप्रकरणी पोलिसांनी बंदूक केली जप्त
फायरिंगप्रकरणी पोलिसांनी बंदूक केली जप्त
रत्नागिरी:काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वरवडे-जयगड येथे भाऊबंदकीतील वाद उफाळून रानात फायरिंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र दहशत माजवण्यासाठी फायरिंग करणाऱ्याची सिंगल बॅरल बंदुक पोलिसांनी जप्त केली असून परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. या बाबत कोणाचीही तक्रार नसल्याने संशयिताला सोडण्यात आले आहे. एका वाडीतील घराजवळ हा प्रकार घडला. फायरिंग झाल्याची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी एका संशयिताला रातोरात ताब्यात घेतले. मात्र त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर तक्रार नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. फायरिंग केल्याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.फायरिंग करणारी व्यक्ती रातोरात घरी आल्याने हा प्रकार तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शस्त्रांचा दुरूपयोग होत असून भर वस्तीत फायरिंग करूनदेखील फायरिंग करणारा मोकाट सुटतोच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्लिक करा आणि वाचा:फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी !
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment