कोल्हापूर ; - सकाळी ७ ची वेळ. कोणा एका गल्लीतल्या अंत यात्रे सोबत तात्या पण त्या व्यक्तीला पोचवायला पंचगंगा घाटावर गेलेले.तस फुलेवाडी ते रिंगरोड भागात कोणीही गेल की पहिला फोन तात्याला. तात्या वेळ काळ न बघता अशा कामात मदतीला पहिला. विचारल की एक ठरलेल वाक्य हमखास कानी पडणारच, शेवटच्या घडीला आपण त्याला साथ दिली न्हाई तर आजवर त्यान मला तोंडभरून हाक मारलेल्या त्या हाकेला काही अर्थ राहील का?' म्हणुन अशा बाबतीत सगळ्यात पुढ तात्या. वय वर्ष विचारलं की पन्नाशी गाठून सात आठ वर्ष झाली असतील अशी मजेत उत्तर देऊन आम्हाला कोड्यात टाकणारी व्यक्ति. त्यांच्या समाजसेवा आणि लोकांच्या मदतीला पडण्याच्या उत्साहानं बर्याच वेळा आम्हाला लाजवलय राव. पण तात्याला भेटल की ती स्फूर्ति तो उत्साह त्यांच्या त्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला पण मिळणार हे मात्र लिहून देण्या इतक खर.
व्यवसाय म्हणाल तर शेती आणि फुलेवाडी मीठारी मळ्यात असणारी पिठाची गिरणी. येवढ्याश्या मालमत्तेवर लोकांच्या कामी पडण्याची उडी घेणारे असे सगळ्यांचे लाडके तात्या. तर विषय असा त्या सकाळी तात्या कोणाला तरी पोहोचवून परत येत असताना एक ९\१० वर्षाचा मुलग्याच मुंडन सुरू होत. गेल्या महिन्यात काही दिवस थंडी खूप होती अगदी त्यातलीच ती एक सकाळ. त्यात पंचगंगा घाटावर थंड पाणी डोक्याला लागल्यावर तो कोवळा जीव कुडकुडायला लागला, थंडीने त्या मुलाची थरथरणारी कांती तात्याच्या नजरेला पडली आणि माणुसकीला जागणारे तात्या अस्वस्थ्य झाले. त्यांनी घरी आल्या आल्या फोन करून मला बोलावून घेतलं. आणि आपल्याला सोलर घ्यायला जायच आहे अस सांगितल. आम्ही दुकानात गेल्यावर भारीतला सोलर पाहिजे म्हणुन सांगितल.
तिथून प्रॉपर व्यवहार पूर्ण करून अवघ्या ४ दिवसात सोलर स्टँड आणि टाकीसकट स्वतः उपस्थित राहून बसवून घेतला. आणि तिथे असणार्या नाभिक लोकांना सक्त ताकीद दिली आत्ता कोणताबी ऋतू असुदे हीथन फूड कोणाच्या टाळक्यावर गार पाणी पड़ता कामा नये. आणि विशेष म्हणजे थंडीत कोणी कुडकुडता कामा नये.
सगळ्यांसाठी सगळ्यांना याचा उपयोग करू द्या. नीट वापर होऊ द्या.
(मजेची गोष्ट अशी तात्या गेली ४६ वर्षे तिन्ही ऋतूत थंड पाण्याने आंघोळ करतात. )
इतक सांगून आम्ही तिथून येताना तात्यांनी या सगळ्या खटाटोपा मागची गोष्ट सांगितली. गेल्या काही दिवसात एक केळ जरी वाटल गेल तरी त्याचे फोटो सोशल मीडिया ला टाकून कौतुकाचे भुकेले पाहिले पण इथे इतक करूनही कुठे वाच्छता होऊ नये म्हणुन निवांत फिरणारे तात्या या दोन माणुसकीच्या दरी मधली पोकळी जाणवली. पण म्हणतात ना, 'गगन भरारीचे वेड मुळात पंखात असाव लागत ते विकत घेता येत नाही.' कोल्हापूरच्या एका सामान्य कुटुंबातला असामान्य माणूस, संभाजी पांडुरंग जाधव, (मिठारी तात्या) मागे कोणतीही राजकीय भावना, ताकत आणि मदत नाही की कसली कधी अपेक्षा नाही. रोजच्या गिरणीतून मिळणार्या कमाईतून एक ठराविक वाटा अशा कामांसाठी तात्यांनी काढलेला असतोच. इतक्या लोकांनी ते दृष्य पाहिल पण त्या पोराची हुडहुडी फक्त तात्याला का जाणवली हे आज घाटावर एका व्यक्तीच मुंडन करताना बघितल्यावर कळल. टाकीची पाहणी करायला गेल्यावर गरम पाण्याने तरारलेला देह पाहून तात्याचा आत्मा सुखावला. तर 'हे असे कोल्हापूर आणि ही अशी कोल्हापुरी माणस.' नेहमी चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरतात ते याच वेगळेपणामुळेच.
(टीप: फोटो काढायला तयार नव्हते तात्या पण जबरदस्तीने उभा करून काढलाय.
आणि ते बोर्डावर लिहिलेले वाक्य तात्याच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला बघितल्यावर लिहाव वाटलं, म्हणुन लिहिलय.
अशा कार्याला शब्द रूपी मदत करू शकलो हे माझ भाग्यच.)
राजधानी_कोल्हापूर ...
(साभार:- fb आम्ही कोल्हापुरी)
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment