*खेड अपंग संस्था आयोजित वधू वर मेळावा उत्साहात संपन्न*

 खेड अपंग संस्था आयोजित वधू वर मेळावा उत्साहात संपन्न



खेड प्रतिनिधी-मंदार आपटे

खेड अपंग संस्थे मार्फ़त दिनांक 14 रोजी दिव्यांगासाठी भव्य वधू वर मेळावा आयोजीत करण्यात आला होता.यावेळी कोरोना चे नियम पाळत अनेक दिव्यांग लोकांनी यांचा लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे मनसे चे राज्य चिटणीस वैभव खेडकर, भाजप चे शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, सौ उज्वला पाटणे,सौ अस्मिता सोहनी, भाजप चे नेते शरद सोहनी, यासह चिपळूण च्या समाजसेवक  अशोक भुस्कुटे, चिपळूण च्या समाजसेविका  ऋतुजा रांजणे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .यावेळी अनिकेत कानडे यांनी यापेक्षा मोठा 

मेळावा आपण घेणार असून संस्थेच्या पाठी नक्की आहोत अशा शुभेच्छा दिल्या तर मनसे चे वैभव खेडेकर यांनी बोलताना म्हणाले की माणूस हा नेहमी शरीरानेच अपंग असतो असे नाही तर काही जण राजकारणात राजकीयबुद्धीने अपंग असतात.काही जण धडधाकड असतात पण ते डोक्याने अपंग असतात.

आपण मात्र आपलं काम करायचं असत मी अत्ता पर्यत खेड नगरपालिकेत अपंगाकरिता कधी ही निधी खर्च झाला नव्हता पण मी मात्र 13हजार रुपये अपंगाच्या हातात चेक दिला आहे.काही जणांना वस्तू घेऊन दिल्या आहेत .या आधी कधीच हा निधी खर्च होत नव्हता मात्र मी माझ्या दिव्यांगासाठी हा निधी खर्च करायला सुरुवात केली आहे .या मेळाव्यात अनेक जणांच्या संसाराच्या रेशीमगाठी जुळून येवो यासाठी शुभेच्छा देतो मी सदैव आपल्या पाठीशी आहे . 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग संस्थचे   अध्यक्ष ओकांर पाटणे, विनय  कोकाटे, मंदार कुलकर्णी, निखिल  महाकाळ,अपूर्व कादडरे,श्री शेट्ये पाटणे,कोशल पवार यांनी मेहनत घेतली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केले तर  तर आभार निखिल महाकाळ यांनी मानले.

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments