वजन कमी करायचंय?
पाहा काही TIPS
लिंबाचा रस प्या
शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी उठल्यावर किंवा फ्रेश झाल्यानंतर लगेच कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून त्याचं सेवन करा. पाण्यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा, एक चमचा ओवा किंवा एक चमचा हळद घालून ते पाणीसुद्धा पिऊ शकता. असं केल्यानं तुमच्या शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर पडून चरबी कमी होण्यास मदत होईल. वजन वाढू न देण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे.
_____________________________________________________________
वॉर्मअप करायला विसरू नका
शक्यतो सकाळी ७ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान व्यायाम करावा. व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मअप करायला विसरू नका. वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे व्हायला मदत होते आणि व्यायामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही. रोज किमान २५ मिनिटं व्यायाम करावा. २५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ व्यायाम करायचा असल्यास काहीच हरकत नाही. पण व्यायाम करण्याची सवय नसल्यास कालावधी हळूहळू वाढवावा.
_____________________________________________________________
साखरेऐवजी गुळाचे सेवन करा
पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे रोज साधारणपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं. साखर आरोग्यास हानिकारक असल्यामुळे शक्य होईल तिकडे साखरेऐवजी गुळाचा वापर करा. आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करावा. डाळी, चणे, राजमा, पनीर हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यास पाण्याचं सेवनसुद्धा अधिक प्रमाणात करावं. वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा.
_____________________________________________________________
मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं कमीतकमी सेवन करा. तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अतिरेक टाळा.
_____________________________________________________________
भरपूर पाणी प्या
शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता देखील वाढते. शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जाही मिळते. दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदे मिळतील. यामुळे चरबी लवकर घटण्यास मदत मिळते.
_____________________________________________________________
चटकदार खाणे कमी करा.
वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडे सोपं होते.
ध्यान केल्याने जागरूकता वाढते, आपल्याच खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किंवा चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.
_____________________________________________________________
आहारामध्ये फळांचा समावेश
कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. पण जेव्हा जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटचे सेवन केले जाते, तेव्हा याचे रुपांतर ऊर्जेमध्ये होण्याऐवजी चरबीमध्ये होते. चरबी शरीरामध्ये जमा होऊ लागल्यास वजन वाढते. यामुळे पाच दिवसात वजन कमी करायचे असेल तर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहारातून वर्ज्य करा. याव्यतिरिक्त जेवणापूर्वी एखादे फळ किंवा फळाचा तुकडा खावा. यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही.
_____________________________________________________________
स्वत:शी प्रेम करा
_____________________________________________________________
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
Comments
Post a Comment