*अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त*

 

  *अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त* 

 



रत्नागिरी।प्रतिनिधी

 मिऱ्या कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर साळवी स्टॉप ते कुवारबांव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास प्रशासनाने काल सुरवात केली.पोलिस संरक्षणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत

काल दिवसभरात ६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.कारवाई सुरू झाल्यानंतर खोकेधारकांची तारांबळ उडाली .


आजही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती  दिली आहे .या मार्गावर रातोरात बांधकामे उभी होत होती.पक्की बांधकामे ,गाडी धुण्यासाठीचा रॅम्प बांधले .शेकडो बांधकामे उभी झाली तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून  कानाडोळा केला गेला.बांधकाम अनधिकृत असतानाही ग्रामपंचायतीकडून पावत्या दिल्या गेल्या.रस्त्याशेजारील मोकळ्या जागा अडवण्यासाठी चढाओढ होती.काहींनी गाळे बांधून भाड्याने दिल्याचेही प्रकार येथे सुरू होते.ही बाब पत्रकारांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती.


भाजपचे नित्यानंद दळवी यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली होती.महामार्गाशेजारील ही बांधकामे हटविण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनीही प्रशासनाला दिलेल्या होत्या.याआधी अनधिकृत बांधकामे करणाऱ्या सव्वाशेजणांना प्राधिकरणाकडून बजावण्यात आल्या.बांधकामे तोडण्यासाठी ६ मार्चचा मुहूर्त ठरला ;परंतु विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ती कारवाई पुढे ढकलण्यात आली होती.शुक्रवारी सकाळी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ,प्रांत कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कारवाईला सुरवात झाली .


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121



Comments