"रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागा मिळणार, ठेंगा नाही"-जिल्हाध्यक्ष आणि विजय भोसले यांची माहीती

  रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागा मिळणार, ठेंगा नाही  जिल्हाध्यक्ष आणि विजय भोसले यांची माहीती


रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांच्या पालकमंत्री नियुक्त जागांच्या निवडीबाबत कॉंग्रेस पक्षाला ठेंगा मिळाला असल्याबाबतचे प्रश्नांकीत बातमी आली होती. याला अनुसरुन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले यांनी दैनिक फ्रेश न्यूजची संपर्क साधला. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले म्हणाले पक्षाला ठेंगा मिळालेला नाही. विविध शासकीय समित्यांच्या पालकमंत्री नियुक्त पदांच्या निवड प्रक्रियेत कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला असलेल्या जागा निश्चितच मिळणार आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना न्याय हा निश्चितच मिळणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे संपर्क मंत्री सतेज पाटील व पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा होऊन ही निवड प्रक्रिया होणार आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना या निवड प्रक्रियेत निश्चीतच समाविष्ट केले जाणार आहे. अशी माहीती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले यांनी दिली आहे. 



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments