*भारताचा इंग्लंडवर सात विकेटस् ने दणदणीत विजय*
भारताचा इंग्लंडवर सात विकेटस् ने दणदणीत विजय
भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान दुसऱ्या टी -20 सामन्यात भारताने काल सात विकेट्स राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला.कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावा करून, भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते.
तर, इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. आघाडीचा फलंदाज के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने, भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला.तेव्हा भारतीय संघाने देखील आपलं खातं उघडलं नव्हतं.पहिल्या षटकात भारतला एकही धाव काढता आली नाही.सॅम करन याने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला.यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरलं.सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली.इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.यानंतर भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला.आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं.यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला.ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी नाबाद ४९ चेंडूत ७३ धावांची खेळी करत भारताला विजयी केलं.श्रेयस अय्यर व विराट कोहली नाबाद राहिले.भारताने १७ षटकं व पाच चेंडूत १६६ धावा केल्या.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment