*धूतपापेश्वर मंदिरात आज नियम पाळून महाशिवरात्र*
*धूतपापेश्वर मंदिरात आज नियम पाळून महाशिवरात्र*
राजापूर:
राजापूरचे आराध्य दैवत आणि भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानचा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे.
श्रीदेव धूतपापेश्वरच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी करून कोरोना संसर्गाला आमंत्रण देण्याऐवजी यू ट्यूब वाहिनी
https://youtu.be/QFTSpgl9B94
या लिंकद्वारे थेट श्रीदेव धूतपापेश्वरचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे भाविकांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे ,असे आवाहन संस्थान श्री देव धूतपापेश्वर न्यासाच्यावतीने केले आहे.
कोरोना महामारी लक्षात घेता प्रांताधिकाऱ्यांनी ५० सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यकम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यावर्षी महाशिवरात्र उत्सव शासकीय नियमांचे पालन करून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करण्याऐवजी ऑनलाइन दर्शन घ्यावे ,असे श्री देव धूतपापेश्वर न्यासाने कळवले आहे.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment