श्रमदान,स्वखर्चातून खाजगी नळपाणी योजना

श्रमदान,स्वखर्चातून खाजगी नळपाणी योजना

राजापूर : गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती अन् महिलांना करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता धोपेश्वर खांबलवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणि स्वखर्चातून खासगी नळपाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी विहीर खोदाई सुरू झाली.१८ फुटांवर पाणीही लागले.शहरानजीकच्या धोपेश्वर खांबलवाडी भागासाठी शासकीय नळपाणी योजना असून वाडीमध्ये सार्वजनिक स्टँडपोस्ट असले तरी, तेथून महिलांना डोक्यावरून पाणी आणावं लागतं.त्यातच,एप्रिल-मेमध्ये या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.त्यामुळे पाण्यासाठी होणारी परवड थांबविण्यासाठी खांबलवाडीतील ग्रामस्थांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार विहीर खोदाईच्या कामाला सुरवात करण्यात आली.या विहिरीवरून घरोघरी नळजोडणी करण्यात येणार असून त्याद्वारे खांबलवाडीतील या नळपाणी योजनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या घरोघरी पाणी येणार आहे.भाजपचे नेते दीपक बेंद्रे यांच्या हस्ते आरंभ झाला.

क्लिक करा आणि वाचा:शहरात मोबाईल सेवेचे बोजबारा

            यावेळी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी ,प्रकाश नाचणेकर ,सचिनखांबल , एकनाथ खांबल ,सुभाष खांबल , विनोद खांबल ,चिंतामणी खांबल , प्रकाश खांबल ,पशुराम खडपे ,सुनील कांबळी ,प्रकाश कांबळी ,रमेश मांजरेकर ,राजू खांबल , केशव बापेडकर , भानू खांबल ,रामचंद्र खांबल उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा:ही कविता नसून औषध आहे, डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी!





..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments