मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत एकेरी उल्लेख;फडणवीसांनी केली दिलगिरी व्यक्त!
मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत एकेरी उल्लेख;फडणवीसांनी केली दिलगिरी व्यक्त!
मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मॅरेथॉन भाषणात ठाकरे सरकारवर चौफेर हल्ला चढवला होता. त्यामुळे आधीच वातावरण तापलेलं असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ताधारी बाकांवरून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेताच देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.
फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी !
राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर देत असताना विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यात मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला गेल्याने वातावरण तापलं. सत्ताधारी सदस्यांनीही त्यास जोरदार आक्षेप घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण थांबवलं व लगेचच संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आपली हरकत नोंदवली.
पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला; मृत्यूचं कारण............
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, सुधीर मुनगंटीवार असतील वा आशिष शेलार असतील, यापैकी कुणाच्याच भाषणात सत्ताधारी पक्षाकडून व्यत्यय आणला गेला नाही. त्यामुळे तशीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना तुमच्याकडून आहे. तुमचे सदस्य मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आहेत, ही बाब गंभीर आहे. आपण त्यांना समज द्यावी, अशी विनंती परब यांनी केली. त्यावर शेलार यांनी आसनावरूनच सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व फडणवीस यांनीही त्याची तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करण्यात आला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण पुढे सुरू झाले.
शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात अडकलाय; CM उद्धव ठाकरे मवाळ झालेत!'-रामदास आठव
दरम्यान, मुख्यमंत्री सभागृहात जोरदार फटकेबाजी करत असून गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचं नाव बदलण्यावरून त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. त्याचवेळी औरंगाबादच्या नामांतरावर भूमिका स्पष्ट करतानाच त्यांनी सावरकरांना अद्याप तुम्ही भारतरत्न का दिला नाही?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.
वजन कमी करायचंय?पाहा काही TIPS
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment